Chakan Crime News: ऑनलाइन गेममध्ये पैसे हरला, यूट्युब बघून वाहन चोरी शिकला

ऑनलाइन गेममध्‍ये एक तरुण पैसे हरला. त्‍याची भरपाई करण्‍यासाठी युट्यूब बघून वाहनरे चोरायला शिकला. चोरीतून मिळालेले पैसे पुन्‍हा ऑनलाइन गेममध्‍ये हरला. चाकण पोलीस सीसीटीव्‍ही फुटेज पाहून त्‍याच्‍या संगमनेर येथील घरापर्यंत पोचले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 17 Oct 2024
  • 12:34 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

चाकण पोलिसांनी केल्या २६ लाखांच्या १८ दुचाकी हस्तगत

ऑनलाइन गेममध्‍ये एक तरुण पैसे हरला. त्‍याची भरपाई करण्‍यासाठी युट्यूब बघून वाहनरे चोरायला शिकला. चोरीतून मिळालेले पैसे पुन्‍हा ऑनलाइन गेममध्‍ये हरला. चाकण पोलीस सीसीटीव्‍ही फुटेज पाहून त्‍याच्‍या संगमनेर येथील घरापर्यंत पोचले.  

अभय सुरेश खर्डे (वय २३, रा. झोळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर, सध्‍या रा. गुंजाळवाडी रोड, संगमनेर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. तसेच चोरीच्‍या गाड्या विक्रीसाठी मदत करणारे रविंद्र निवृत्‍ती गव्‍हाणे (वय २३, रा. आंजनापूर, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), शुभम बाळासाहेब काळे (वय २४, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), यश नंदकिशोर थुट्‌टे (वय २२, रा. चिखली, जि. बुलढाणा. सध्‍या रा. अशोकनगर, नाशिक), प्रेम भाईदास देवरे (वय २०, रा. अशोकनगर, नाशिक) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्‍या २६ लाख रुपयांच्‍या १८ दुचाकी पोलिसांनी हस्‍तगत केल्‍या.

चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नाथा घार्गे, सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, गणपत धायगुडे, अंमलदार हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, सुनील शिंदे, शिवाजी चव्हाण, राजु जाधव, ॠषीकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, सुनील भागवत, महेश कोळी, महादेव विक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरणार, नितीन गुंजाळ, किरण घोडके, माधुरी कचाटे यांच्‍या पथकाने ही कारवाई केली आहे.

१५० सीसीटीव्‍ही फुटेजची केली पाहणी
पोलीस उपायुक्‍त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतून बुलेट चोरीला जाण्‍याचे प्रमाण वाढले होते. एका ठिकाणी चोरी झालेल्‍या बुलेटच्‍या शोधासाठी पोलीस १५० सीसीटीव्‍ही फुटेज पाहत संगमनेरपर्यंत पोहचले. तिथे आरोपी अभय खर्डे याला ताब्‍यात घेतले. त्‍याच्‍याकडे चौकशी केली असता त्‍याने चाकण आणि आसपासच्‍या परिसरातून १८ दुचाकींची चोरी केल्‍याची कबुली दिली. तसेच चोरीच्‍या दुचाकी विकण्‍यासाठी त्‍याला मदत करणार्‍या चारही आरोपींना अटक केली. त्‍यांनी ग्रामीण परिसरात विकलेल्‍या चोरीच्‍या १८ बुलेट हस्‍तगत केल्‍या.

 बुलेट चोरी करण्यावर भर
आरोपी अभय खर्डे याला ऑनलाइन गेम खेळण्‍याचा नाद होता. यामध्‍ये तो पैसे हरला. हरलेले पैसे परत मिळविण्यासाठी त्‍याने चोरी करण्‍याचा निर्णय घेतला. युट्युबवर पाहून तो दुचाकींची चोरी कशी करायची, हे शिकला. बुलेटला किंमत मिळत असल्‍याने तो सहसा बुलेटच चोरी करीत असे. त्‍याच्‍या ताब्‍यातून २६ लाख रुपयांच्‍या ११ बुलेट, सहा स्प्लेंडर आणि एक यामाहा दुचाकी हस्‍तगत केल्‍या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest