पत्नीला वाचवण्यासाठी पतीने मारली विहिरीत उडी, पत्नीने मिठी मारल्याने दोघांचाही बुडून मृत्यू

शेतातील विहिरीत कपडे धुताना पाय घसरून पत्नी पाण्यात पडली. तिच्या आवाजामुळे जवळच असलेला पती धावून आला व पत्नीला वाचवण्यासाठी त्याने विहिरीत उडी मारली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 16 Oct 2024
  • 03:38 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

शेतातील विहिरीत कपडे धुताना पाय घसरून पत्नी पाण्यात पडली. तिच्या आवाजामुळे जवळच असलेला पती धावून आला व पत्नीला वाचवण्यासाठी त्याने विहिरीत उडी मारली. मात्र पत्नीने त्याच्या गळ्याला मिठी मारल्याने दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी येथे हा प्रकार सकाळी घडला.  संगपा चिंदप्पा कोळी (वय ३८)  सुनीता उर्फ सावित्री संगप्पा कोळी (वय ३१) बाळगी तालुका दक्षिण सोलापूर  अशी या पती-पत्नीची नावे आहेत. कोळी कुटुंबाची बाळगी गावाला शेती आहे. सुनीता ही सकाळी कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेली असता पाय घसरून ती पाण्यात पडली. आरडाओरड केल्याने पतीने विहिरीत उडी मारली. त्यावेळी तो आपल्या शेतात द्राक्षावर औषध मारत होता. ते सोडून त्याने लगेच उडी मारली. मात्र पत्नीने त्याला मिठी मारली आणि ते दोघेही बुडाले. त्यानंतर गावातील सर्वांनी मिळून विहिरीतील दोन मृतदेह बाहेर काढले.

सदर दुर्घटनेची नोंद मंद्रूप येथे पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून त्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व त्यांचे सहकारी करत आहेत.  त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest