Pune News: उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने जमवले बेहिशेबी घबाड, शासकीय अधिकारी शिरीष यादव यांच्यासह पत्नीविरुद्ध गुन्हा

पुणे : शासकीय नोकरीत असताना कोट्यवधी रुपयांचे घबाड गोळा करणाऱ्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : शासकीय नोकरीत असताना कोट्यवधी रुपयांचे घबाड गोळा करणाऱ्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीष रामचंद्र यादव आणि प्रतीक्षा शिरीष यादव अशी गुन्हा दाखल झालेल्या पतीपत्नीची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली असून चौकशीमध्ये  यादव यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा एक कोटी ३८ लाख ७४ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी फिर्याद दिली आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष यादव हे पुण्यामधील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयामध्ये उपमुख्य अधिकारी म्हणून नेमणुकीस होते. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई देखील केलेली होती. त्यानंतर यादव यांची एसीबीने बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरु केली होती. 

शासकीय सेवा कालावधीमध्ये त्यांना मिळालेल्या उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न त्यांनी कमावल्याचे तपासात समोर आले. या उत्पन्नाबाबत यादव दाम्पत्य समाधानकारक खुलासा करुन शकले नाही. तसेच, ज्ञात उत्पन्नापेक्षा त्यांच्याकडे एक कोटी ३८ लाख ७४ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे समोर आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपअधीक्षक अनिल कटके याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest