Pune News: पोलीस निरीक्षकासह सहायक फौजदार निलंबित; अटक न करण्यासाठी केली होती पाच लाखांच्या लाचेची मागणी

पुणे : फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सहआरोपी करून अटक न करण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागीतल्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात पुणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकासह एका सहायक फौजदाराला निलंबित करण्यात आले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सहआरोपी करून अटक न करण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागीतल्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात पुणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकासह एका सहायक फौजदाराला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश दिले. गुन्हे शाखेचे युनिट ३ चे तत्कालीन निरीक्षक श्रीहरी बहिरट आणि सहायक फौजदार संतोष क्षीरसागर अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. 

बहिरट हे सध्या गुन्हे शाखेच्या दंगा नियंत्रण पथकामध्ये कार्यरत आहेत. ते गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस निरीक्षक असताना बहिरट यांच्या सांगण्यावरुन फसवणुकीच्या गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी सहायक फौजदार क्षीरसागर याने एका व्यक्तीकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तडजोडीअंती बहिरट यांच्या सांगण्यावरून क्षीरसागर याने दोन लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. त्यावेळी बहिरट यांना संशय आला. त्यांनी तक्रारदाराकडे असलेला व्हॉईस रेकॉर्डर काढून घेतला होता. 

त्यामुळ ही कारवाई होऊ शकली नव्हती. परंतु, लाचेची मागणी झाली असल्याने क्षीरसागर याच्याविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक बहिरट यांच्या सहभागाविषयी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग तपास करत आहे. त्यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने बहिरट व क्षीरसागर यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest