Pune Crime News: मंत्री तानाजी सावंतांच्या सुरक्षारक्षकाच्या घरी ‘मिस फायर’, कपाटातील बॅग खाली पडून रिव्हॉल्व्हरमधून झाडली गेली गोळी, मुलाच्या पायाला गंभीर जखम

पुणे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडी येथील बंगल्यावर काम करणार्याय सुरक्षा रक्षकाच्या घरी ‘मिस फायर’ची घटना मंगळवारी दुपारी घडल्याचे समोर आले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडी येथील बंगल्यावर काम करणार्याय सुरक्षा रक्षकाच्या घरी ‘मिस फायर’ची घटना मंगळवारी दुपारी घडल्याचे समोर आले आहे. कपाटामधून बॅग बाहेर काढत असताना त्यांच्या १३ वर्षीय मुलाच्या हातून ही बॅग निसटली. खाली पडलेल्या या बॅगेत असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली गेली. ही गोळी मुलाच्या पायाला लागली. यामध्ये त्याच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभय नितीन शिर्के (वय १३) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन हनुमंत शिर्के (वय ४०, रा. श्री गणेश अपार्टमेंट, वनराई कॉलनी, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्के हे माजी सैनिक आहेत. ते लष्करी सेवेमधील निवृत्त झालेले आहेत. ते मंत्री सावंत यांच्या धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आहे. त्यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमध्ये गोळ्या भरून बॅगेत ठेवले होते. 

कसलीही खबरदारी न घेता रिव्हॉल्व्हर असलेली ही बॅग त्यांनी घरातील कपाटात ठेवली. त्यांचा मुलगा अभय याने कपडे घालण्यासाठी कपाट उघडले. शर्ट घातल्यानंतर पँट घालत असताना त्याचा धक्का या बॅगेला लागला. रिव्हॉल्व्हर असलेली ही बॅग खाली पडली. रिव्हॉल्ववर खाली आदळल्याने त्यातून गोळी झाडली गेली. ही गोळी त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीला लागली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान,  रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे व अन्य अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन मुलाची विचारपूस क. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील अधिक तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest