पुणे : ‘आर्कलाईन लॉजिस्टीक्स अँड वेअरहाऊस’मधून २८० लॅपटॉप लंपास; तब्बल एक कोटी रुपयांचे लॅपटॉप गेल्याने खळबळ

वाघोली येथील ‘आर्कलाईन लॉजिस्टीक्स अँड वेअरहाऊस’ या गोदामामधून १ कोटी ९ लाख रुपयांचे तब्बल २८० लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

वाघोली पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुणे : वाघोली येथील ‘आर्कलाईन लॉजिस्टीक्स अँड वेअरहाऊस’ या गोदामामधून १ कोटी ९ लाख रुपयांचे तब्बल २८० लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कंपनीच्याच कामगारांनी केल्याचा संशय असून त्यांच्याकडे कसून चौकाशी केली जात आहे. दरम्यान, विविध कंपन्या विश्वासाने या गोदामांमध्ये आपला माल ठेवत असतात. अशा घटना घडू लागल्याने गोदामांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुरेश कुमार (रा. उबाळेनगर, वाघोली, नगर रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी बाळकृष्ण सखाराम राऊत (वय ३८, रा. केसनंद, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. राऊत हे कंपनीचे व्यवस्थापक आहेत. तर, आरोपी कामगार आहे. तो मागील दोन महिन्यांपासून याठिकाणी काम करीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्कलाईन लॉजिस्टीक्स अँड वेअरहाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वाघोलीतील उबाळेनगर परिसरात आहे.  या कंपनीच्या वाघोली येथील गोदामामध्ये विविध नामांकित कंपन्यांची इलेकट्रोनिक्स उत्पादने ठेवण्यात येतात. याठिकाणावरुन शहरातील विविध दुकाने, शोरूम आणि वितरकांना ही उत्पादने विक्रीसाठी पाठविली जातात. 

आरोपी सुरेश कुमार याने सोमवारी सकाळी गोदामातून २८० लॅपटॉप चोरून नेले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. कंपनीच्या परिसरात आणि आरोपीच्या घराकडे देखील त्याचा शोध घेण्यात आला. या घटनेची माहिती वाघोली पोलिसांना कळवण्यात आली. वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करीत आरोपीचा शोध सुरू केला. निरीक्षक रेजीतवाड यांनी सांगितले, की आरोपी पसार झाला आहे. त्याने चोरलेले लॅपटॉप कुठे ठेवले आहेत? या चोरीमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का? याचा शोध घेतला जात आहे. 

यापूर्वी वाघोलीमधील एका गोदामामधून ६५ लाख रुपयांचे १०५ आयफोन चोरून नेण्यात आल्याची घटना घडली होती. या गोदामाचे पत्रे उचकटून चोरट्यांनी हात साफ केला होता. याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर वैभव झेंडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करुन परप्रांतीय चोरट्यांना अटक केली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest