पुणे: क्रिकेटच्या वादातून महिलांना मारहाण तर दोघांवर कोयत्याने वार

पुणे : क्रिकेट खेळण्याच्या वादामधून टोळक्याने तरूणासह महिलांना बेदम मारहाण केली. तसेच, ही भांडणे मिटवण्यासाठी गेलेल्या दोघांवर कोयत्याने वार करण्यात आले. हा प्रकार येरवडा येथील चंद्रमानगरमधील मोकळ्या मैदानावर रविवारी संध्याकाळी घडली.

Pune Crime News, Yerwada, Pune Police, Yerwada Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : क्रिकेट खेळण्याच्या वादामधून टोळक्याने तरूणासह महिलांना बेदम मारहाण केली. तसेच, ही भांडणे मिटवण्यासाठी गेलेल्या दोघांवर कोयत्याने वार करण्यात आले. हा प्रकार येरवडा येथील चंद्रमानगरमधील मोकळ्या मैदानावर रविवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी विनयभंग, तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करीत सहा जणांना गजाआड केले आहे. 

हुसेन अस्लम खान, आमीर अस्लम खान, अस्लम हैदर खान, शोएब रशीद कुरेशी, वीरेन वाघेला, स्टीफन जाॅन्सन शिरसाठ (सर्व रा. येरवडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ५१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. येरवडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (३० जून) सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी येरवड्यातील मनोरुग्णालयासमोरील मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत होते. त्यावेळी आरोपींनी विल्सन मरिअन याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. या वादामधून विल्सनला मारहाण करण्यात आली. फिर्यादी महिला, तिची छोटी बहीण, तसेच हरिश बबन काळे, यशवंत बबन काळे हे घटनास्थळी गेले. त्यांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. 

आरोपी आमीर याने घरी धावत जाऊन कोयता आणि कुकरी अशी दोन हत्यारे आणली. हरिशला कोयत्याच्या दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यशवंतच्या खांद्यावर कोयत्याचा दांडा मारून त्याला जखमी केले. फिर्यादी महिलेच्या छोट्या बहिणीशी अश्लील कृत्य केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी महिलेच्या दोन मुलींना देखील आरोपींनी मारहाण केली. त्यांच्या अंगावरील गाऊन फाडला. पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे ठारण्याची धमकी दिली. तसेच आरोपींनी महिलांच्या अंगावरील कपडे फाडले. फिर्यादी महिलेला आरोपी हुसेन याने ‘तु मध्ये पडू नकोस, नाहीतर तुझ्या डोक्यात फरशी टाकेल.’ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढताना ‘आम्ही जर लॉकअपला गेलो आणि नंतर सुटून आलो की दिसेल तिथे सर्वांचे तुकडे करणार’ अशी धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक तुषार दोडमिसे तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest