पुणे: लष्करात भरतीच्या नावाने २९ लाखांना गंडवले; कोल्हापूरच्या एकाच कुटुंबातील तिघांची फसवणूक

पुणे : पुण्यातील खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाच कुटुंबातील तिघा जणांची २९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही फसवणूक करणाऱ्या कोल्हापूर येथील व्यक्ती विरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News, Pune Crime News, Pune Police, Fraud News, Khadki Police, Military Southern Command

संग्रहित छायाचित्र

पुणे : पुण्यातील खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाच कुटुंबातील तिघा जणांची २९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही फसवणूक करणाऱ्या कोल्हापूर येथील व्यक्ती विरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लष्कराच्या दक्षिण कमांडच्या गुप्तचर विभाग (मिलिटरी इंटेलिजन्स) आणि खडकी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत हा गुन्हा दाखल केला. हा प्रकार एक जून २०२० ते १७ जुलै २०२१ या कालावधी दरम्यान घडला.

संदीप बळवंत गुरव (वय ३९, रा. संस्कार बंगला, शांती उद्यान, आपटे नगर, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याची साथीदार अश्विनी लक्ष्मण पाटील हिला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी साताप्पा रामचंद्र वाघरे (वय ४६, रा. करंजफेल, शिरोली, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राधानगरी आगारामध्ये वाहक अर्थात कंडक्टर म्हणून काम करतात. २०२०२ मध्ये हुपरी येथे त्यांचे मित्र संतोष यांच्यामार्फत आरोपी संदीप गुरव यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यावेळी तेली यांनी गुरव हे आर्मी मधून सेवानिवृत्त झाले असून त्यांची आर्मीमध्ये मोठी ओळख आहे. ते आर्मीमध्ये वेगवेगळ्या पदावर नोकरी लावण्याचे काम करतात असे सांगितले.

 फिर्यादी यांनी त्यांचा वाचा अजिंक्य बळवंत रेडकर हा आर्मी भरतीची तयारी करत असल्याचे सांगितले. त्याच्यासाठी मदत करण्याची विनंती केली. त्यावेळी त्याने त्याला अजिंक्यला मिलिटरीमध्ये नोकरी लावण्यासाठी मदत करत असे सांगितले. त्याला मिलिटरी हॉस्पिटल, खडकी येथे घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार, २६ नोव्हेंबर २०२९ रोजी भाचा अजिंक्य, पत्नी माधुरी आणि मेव्हणा विश्वास दिनकर चौगुले यांना घेऊन खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये गेले.  त्या ठिकाणी संदीप त्यांना भेटला. या तिघांनाही नोकरी लावण्याचे आमिष त्याने दाखवले. तेथे त्याने आर्मी ऑफिसर सुरज सिंग यांच्याशी ओळख करून दिली.

 या आर्मी ऑफिसरने तिघांचे नोकरीचे काम होईल अशी बतावणी केली. त्यानंतर पत्नी माधुरी, भाचा अजिंक्य, मेव्हणा  विश्वास यांच्यासाठी प्रत्येकी १२ लाख रुपये प्रमाणे ३६ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्या ठिकाणी त्यांच्याकडून एक पेपर तर सोडवून घेतला. या तिघांच्या भरतीच्या बदल्यात वेळोवेळी २९ लाख १० हजार रुपये करण्यात आले.  तिघांना मिलिटरी हॉस्पिटल खडकी यांच्या ओआयसी यांची सही असलेले व मिलिटरी हॉस्पिटल ट्रेनिंग कंपनी असा गोल बनावट शिक्का असलेले तसेच कामावर रुजू करून घेण्यासाठीचे बनावट पत्र दिले. तसेच खोटे ओळखपत्र तयार करून दिले आणि फसवणूक केली. ही माहिती लष्कराच्या दक्षिण कमांडच्या गुप्तचर विभागाला (मिलिटरी इंटेलिजन्स) मिळाली होती. त्यानुसार खडकी पोलिसांच्या ही कारवाई करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest