पुणे : शिवाजीनगर येथील नदीपात्रात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

पुण्यातील शिवाजीनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पुलाखालील नदीपात्रात एका अनोखळी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळातच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, अनोखळी व्यक्तीची ओळख पटवणे पोलीसांसमोर मोठे आव्हान आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 27 Jul 2023
  • 11:54 am
Pune : शिवाजीनगर येथील नदीपात्रात सापडला अनोखळी व्यक्तीचा मृतदेह

शिवाजीनगर येथील नदीपात्रात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

मृतदेहाची ओळख पटवणे पोलीसांसमोर आव्हान

पुण्यातील शिवाजीनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पुलाखालील नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळातच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, अनोळखी व्यक्तीची ओळख पटवणे पोलीसांसमोर मोठे आव्हान आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील मुळा-मुठा नदीपात्रात एका अनोळखी बेवारस मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह पुरुषाचा असून त्याचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्ष असावे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मात्र, मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा अपघाता झाला की घातपात झाला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मृत व्यक्तीबद्दल आपल्या पोलीस ठाण्यास मिसिंग दाखल असेल तर त्वरित माहिती कळवावी, असे आवाहन शिवाजीनगर पोलीसांनी केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शिवाजीनगर हे शहरातील गर्दीचे ठिकाण आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी बेवारस मृतदेह सापडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest