पुणे पोलीसांचे “मेगा कोम्बिंग ऑपरेशन”, १८२४ गुन्हेगारांची तपासणी, ११५ जणांना अटक
पुणे शहरात गुन्हेगारी सातत्याने वाढत चालली आहे. टोळक्यांनी हौदोस घातला आहे. चोरी, मारामारी, बलात्कार अशा घटना रोज घडताना दिसत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून गेल्या काही दिवसांपासून “मेगा कोम्बिंग ऑपरेशन”च्या माध्यमातून गल्ली-बोळात धाड टाकण्यात येत आहे. या ऑपरेशनमध्ये १४ जुलै रोजी रात्री १० ते २ या दरम्यान एकूण १८२४ गुन्हेगारांची पोलीसांनी तपासणी केली. यामध्ये ५७७ गुन्हेगार मिळून आले. त्यातील ११५ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
विशेष मोहिमे दरम्यान पोलीसांनी केलेल्या कारवाईमध्ये एकुण १३ आर्म अॅक्ट गुन्ह्यांमध्ये एकुण १३ आरोपी अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडुन २ पिस्टल, ७ जिवंत काडतुसे, तसेच १२ धारदार हत्यारे असा एकुण ८५ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच परिमंडळ १ मध्ये विशेष मोहीम दरम्यान गुन्ह्यात निष्पन्न परंतू अटक नसलेले एकुण २ आरोपी अटक करण्यात आलेले आहे. याशिवाय, मपोका १४२ प्रमाणे १ केस करुन १ आरोपीस अटक केली आहे. तसेच प्रोव्हिबिशन प्रमाणे ३ केसेस करण्यात आलेल्या असुन ३ आरोपींकडुन ३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर जुगार अॅक्ट प्रमाणे एकुण २ केसेस करुन २ आरोपींकडुन ३ हजार ३०० रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
तसेच परिमंडळ-२ मध्ये विशेष मोहिमे दरम्यान गुन्ह्यात निष्पन्न परंतू अटक नसलेले एकुण ३ आरोपी अटक करण्यात आलेले आहे. मपोका १४२ प्रमाणे १ केस करुन १ आरोपी अटक केला आहे. तसेच प्रोव्हिबिशन प्रमाणे ७ केसेस करण्यात आलेल्या असुन ७ आरोपींकडुन ७ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार अॅक्ट प्रमाणे एकुण ३ केसेस करुन ३ आरोपींकडून ३ हजार २९० रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
परिमंडळ-३ मध्ये विशेष मोहिमे दरम्यान गुन्ह्यात निष्पन्न परंतू अटक नसलेले एकूण १ आरोपी अटक करण्यात आलेले आहे. तसेच प्रोव्हिबिशनमध्ये एकूण ११ केसेस करुन १२ आरोपीकडून ६ हजार ९८० रुपयांचा तसेच जुगार अॅक्ट प्रमाणे एकूण २ केसेस करुन ४ आरोपींकडून १ हजार १९५ रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. परिमंडळ-४ मध्ये विशेष मोहिमे दरम्यान गुन्ह्यात निष्पन्न परंतू अटक नसलेले एकूण ११ आरोपी अटक करण्यात आलेले आहे. मपोका १४२ प्रमाणे १ कारवाई करुन १ आरोपी अटक केला आहे. तसेच प्रोव्हिबिशनमध्ये एकूण १४ केसेस करुन १४ आरोपीकडून ९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जुगार अॅक्ट प्रमाणे एकूण ११ केसेस करुन ३३ आरोपींकडून २२ हजार ४४५ रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
याशिवाय परिमंडळ-४ मध्ये विशेष मोहिमे दरम्यान प्रोव्हिबिशन अॅक्ट प्रमाणे एकूण २ केसेसमध्ये २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यांकडून १ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर एनडीपीएस प्रमाणे एका कारवाईत एका आरोपीकडून ९ हजार ५०० रुपये किमतीचे ३ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे.