पुणे: राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवडीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

शासकीय नोकरीच्या निवडीमध्ये येणाऱ्या त्रुटींचा विचार करून ही नोकरी मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग खेळामध्ये राखीव खेळाडू म्हणून खेळवून त्याचे प्रमाणपत्र देण्याच्या आमिषाने एका तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे.

Pune News, Pune Crime News, Fraud News, Warje Malwadi Police Station

संग्रहित छायाचित्र

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा, नोकरीसाठी वेटलिफ्टिंग स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून खेळवण्याचे आमिष

शासकीय नोकरीच्या निवडीमध्ये येणाऱ्या त्रुटींचा विचार करून ही नोकरी मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग खेळामध्ये राखीव खेळाडू म्हणून खेळवून त्याचे प्रमाणपत्र देण्याच्या आमिषाने एका तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासक अधिकारी म्हणून काम करणाऱ्या एकाने  फिर्यादी तरुणाला भुलथापा देत दोन भावांनी तब्बल ७ लाख ५० हजारांना गंडवण्यात आले. हा प्रकार २७ जुलै २०१९ आणि १३ नोव्हेंबर २०१९ रोजी घडला. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन अरुण अनंतकवळस आणि अमोल अरुण अनंतकवळस अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पवन ज्ञानोबा म्हस्के (वय ३२, रा. चंद्राई बंगलो, तपोधाम परिसर, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे.

वारजे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी म्हस्के हे पुण्यामध्ये बहीणीकडे राहण्यास आहेत. फिर्यादी फार्मासिस्ट असून ते एका औषध दुकानात नोकरी करतात. त्यांचे २०१५ मध्ये बीएसस्सीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याकरिता त्यांनी सदाशिव पेठेमधील कुमठेकर रस्त्यावर असलेल्या ‘स्कॉलर अॅकॅडमी’मध्ये प्रवेश घेतला. त्याचदरम्यान नगरपरिषद कुर्डुवाडी येथे ते काही कामानिमित्त गेले होते. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासक अधिकारी म्हणून काम करणारे सचिन याच्याशी त्यांची ओळख झाली. तोदेखील फिर्यादीप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.

दरम्यान, फिर्यादी आणि आरोपी सचिन यांच्यामधील चार वर्षांच्या ओळखीचे रुपांतर चांगल्या मैत्रीमध्ये झाले. तो शिक्षण खात्यात असल्याने त्याने ओळख वापरुन फिर्यादीच्या एका भाच्याचे नोकरीचे काम पुण्यात केले होते. याच दरम्यान फिर्यादीदेखील नोकरीच्या शोधात होते. काही त्रुटीमुळे त्यांची स्पर्धा परीक्षेमधून निवड होत नव्हती. याबाबत त्यांनी आरोपी सचिनशी बोलणे केले. त्यावेळी त्याने नोकरी मिळविण्याकरिता राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये राखीव खेळाडू म्हणून खेळवतो. तसे, प्रमाणपत्र प्राप्त करुन देतो, असे आमिष दाखवले. या प्रमाणपत्राचा नोकरी मिळविण्याकरिता उपयोग होईल असा विश्वास दिला. त्याकरिता पैसे खर्च करावे लागतील, असे सांगितले.

खेळाडू म्हणून प्रमाणपत्र मिळाल्यास नोकरी मिळवणे सोपे होईल, असे समजून फिर्यादींनी पैसे देण्याची तयारी केली. स्वत:जवळ पुरेशी रक्कम नसतानादेखील केवळ नोकरीसाठी त्यांनी पैसे देण्याचे कबूल केले. २७ ऑगस्ट २०१९ रोजी फिर्यादी व त्यांच्या मेव्हण्याने जनता सहकारी बँकेच्या वारजे शाखेमधून सचिनच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नारायण पेठ शाखेतील खात्यावर आरटीजीएसव्दारे काही रक्कम पाठविली.

नंतर आरोपीने फिर्यादीला आणखी पाच लाख रुपये त्याचा भाऊ अमोलच्या स्टेट बँकेच्या कुर्डुवाडी शाखेत पाठविण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादीने त्यांच्या बहिणीच्या खात्यामधून ही रक्कम पाठवली. त्यावेळी अमोलने हे पैसे सचिनला दिल्याची खात्री दिली. तसेच फिर्यादीला खेळाडू म्हणून प्रमाणपत्र लवकरच देण्यात येईल, असे अश्वासन दिले. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादी खेळाडू म्हणून प्रमाणपत्राची मागणी करत होते. परंतु, आरोपी सचिन व अमोल हे दोघेही खेळांच्या स्पर्धा आल्या की आम्ही कळवतो, असे सांगून निव्वळ वेळ मारून नेत होते. त्यांच्या हेतूबाबत शंका आल्याने दोघांनाही खेळाचे प्रमाणपत्र नको आहे, असे सांगत दिलेली रक्कम परत मागितली. तेव्हा, सचिन व अमोल हे पैसे देण्यास टाळाटाळ करुन वेळ मारून नेत होते. हे पैसे त्यांना अद्याप परत करण्यात आले नसल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest