पुणे : अवैध धंदे... तपासणी आणि कारवाई सुरू; गुन्हे शाखेच्या १५० कर्मचाऱ्यांची १३ पथके तैनात

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील बेकायदा धंदे बंद करण्याचे सक्त आदेश दिल्यानंतर देखील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अद्यापही असे धंदे सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या धंदयांची पाळेमुळे खोदण्यासाठी थेट गुन्हे शाखेवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

Pune Crime News

पुणे : अवैध धंदे... तपासणी आणि कारवाई सुरू गुन्हे शाखेच्या १५० कर्मचाऱ्यांची १३ पथके तैनात

पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील बेकायदा धंदे बंद करण्याचे सक्त आदेश दिल्यानंतर देखील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अद्यापही असे धंदे सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या धंदयांची पाळेमुळे खोदण्यासाठी थेट गुन्हे शाखेवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. तब्बल १५० कर्मचाऱ्यांची १३ पथके तयार करण्यात आली असून मंगळवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच परीमंडळ चारच्या अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तपासणी करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत बेकायदा सिगारेटचा साठा, इलेक्ट्रिक सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. (Pune Crime News)

बेकायदा धंदे आणि त्यामुळे होणारे सामाजिक परिणाम याविषयी पोलीस आयुक्तांनी कडक धोरण अवलंबले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या पाचही परिमंडळांच्या हद्दीत केव्हाही भेट देऊन (सरप्राईज) पाहणी आणि तपासणी केली जाणार आहे. अवैध सुरू असलेल्या ठिकाणांवर प्रत्यक्ष जाऊन त्यांची पाहणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय आढळून येणार नाही तेथे सील पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  या कारवाईसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची सर्व पथके नेमण्यात आली आहे.

शहरातील बेकायदा पब-बार बंद करण्यात आले आहेत. यासोबतच हातभट्टी, मटका, जुगार आदी प्रकारचे अवैध धंदे, बेकायदा सावकारी, जमीन खरेदी विक्रीच्या तोडपाणी, ‘सेटलमेन्ट’ यावर देखील बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी अवैद्य धंदे वाल्यांकडून वसूली करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांचे एक महिन्याचे उजळणी प्रशिक्षण घेतले जाणार आहे. यासोबतच पोलीस आयुक्तालयामध्ये सर्व बेकायदेशीर धंदे चालवणाऱ्यांची परेड घेतली जाणार असल्याचे देखील आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील बेकायदेशीर धंदे चालवणारे, या धंद्यांना आश्रय देणाऱ्यांना एक प्रकारे इशारा देण्यात आला असून अनेकांनी गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest