संग्रहित छायाचित्र
पुण्यातील चतुश्रृंगी आणि बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एल. एस. डी. ओझीकुश गांजा, एम.डी.एम.ए.च्या पिल्स आणि गांजा असा एकूण १८ लाख २५ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी चार जणांना पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली विरोधी पथक २ ने केली आहे.
तनुज मनोजकुमार कामब्रत (वय २२, रा. इशाना बिल्डींग, प्लॅट नं. ७, भुसारी कॉलनी कोथरूड, पुणे), जिवन बिजु टॉटम (वय २०, रा. ईलाईट अम्पायर, बाणेर, पुणे), शशिकांत चांगदेव नलवडे (वय २९, रा. मु. पो. धनगरवाडी, कोडोली, ता. जि. सातारा) आणि प्रतिक युवराज ओहोळ (वय १९, रा. मु. पो. सालसे, ता. करमाळा, जि. सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे अधिकारी २७ मे रोजी चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. यावेळी अनाधिकृतपणे गांजा विक्री केला जात असल्याची माहिती खबऱ्यामार्फेत मिळाली. त्यानुसार, बालेवाडी गावठाणरोड रेगुलस सोसायटी येथे सापळा रचून पोलीसांनी तनुज आणि जिवनला ताब्यात घेतले. यावेळी त्यांची चौकशी केली असता १ लाख ६६ हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. यात ६५ हजार रुपये किमतीचे एल.एस.डी, ९ हजा ७२५ रूपये किमतीचा ओझोकुश गांजा, ७१ हजार ५०० रुपये किमतीच्या एम. डी. एम. ए. च्या गोळया असा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. तसेच त्यांच्यावर एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (अ), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या कारवाईत समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब)(ii) (क), २९ नुसार गुन्ह्यातील आरोपी शशिकांत नलवडे हा गेल्या पाच महिन्यांपासून फरार होता. २७ मे रोजी अंमली विरोधी पथक २ ला हा आरोपी पुणे स्टेशन परिसरात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पुणे रेल्वे स्टेशनच्या एक्झीट गेटचे समोरील बालाजी रसवंती गृहासमोर येथून शशिकांत आणि त्याचा साथीदार प्रतिकला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १६ लाख ३५ हजार १०० रुपये किमतीचा ८१ किलो ७५५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच त्यांच्यावर एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब), (ii), (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.