Pune Crime News : पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचे दिल्लीपर्यंत धागेदोरे, एकाला अटक

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीमध्ये पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी बनावट चलनांच्या छापखान्यावर छापा टाकला असून एकाला अटक केली आहे. मात्र, या प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीपर्यंत असल्याचा संशय पोलीसानी व्यक्त केला आहे.

Pune Crime News : पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचे दिल्लीपर्यंत धागेदोरे, एकाला अटक

पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचे दिल्लीपर्यंत धागेदोरे, एकाला अटक

शिरुरमध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीमध्ये पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी बनावट चलनांच्या छापखान्यावर छापा टाकला असून एकाला अटक केली आहे. मात्र, या प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीपर्यंत असल्याचा संशय पोलीसानी व्यक्त केला आहे.

मनिष अमर पाल (वय २४, रा. रेवाना. जि. घाटमपुर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधाता रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारेगावच्या हद्दीमध्ये बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार, पोलीसांनी यशईन चौकातील यझाकी कंपनीजवळ सापाळा लावून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. बनावट नोटांचे रॅकेट दिल्लीपर्यंत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यावेळी बनावट नोटा घेण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक केल्यानंतर बनावट नोटांचे रॅकेट रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी उघड केले. आरोपीकडून ५०० रुपये दराच्या ६० नोटा अशा एकूण ३० हजार रुपयाच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest