पुणे: नात्यातील अल्पवयीन मुलीला इंजेक्शन देऊन केले अत्याचार, बेशुद्ध असताना फोटो काढून केले ब्लॅकमेल

पुणे: जवळच्या नातेवाईक तरुणाने १४ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १९ फेब्रुवारी २०२१ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 21 Sep 2024
  • 03:09 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे: जवळच्या नातेवाईक तरुणाने १४ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १९ फेब्रुवारी २०२१ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने या मुलीच्या दंडावर गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन टोचले. ही मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर तिची नग्नावस्थेतील छायाचित्रे काढली. सोशल मिडियात ही छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी त्याने मुलीला दिली. तिला ब्लॅकमेल करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास ही छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, जेव्हा भेटायला बोलावेन, तेव्हा भेटायला यायचे असे धमकावल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest