संग्रहित छायाचित्र
पुणे : पायी जात असताना एकास चौघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार पुण्यातील जनता वसाहतीतून समोर आला. जुन्या भांडणातून हा प्रकार घडला आहे. ही घटना १४ जानेवारी रोजी शंकर मंदिराजवळ घडली. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मंदार मुरलीधर बचाटे (वय २६, जनता वसाहत पर्वती, पुणे) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलीसांनी १) तुषार बनसोडे बचाटे (वय २६), २) सगून जौंजट (वय १९), ३) साहील सोनवणे (वय २०, (४) चंप्या कांबळे (वय २०) सर्व राहणार जनता वसाहत पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंदार हे मंगळवारी (१४) रोजी शंकर मंदिर परिसरातून पायी जात होते. त्यावेळी आरोपी तुषार यांच्या सोबत झालेल्या जुन्हा भांडणाच्या कारणावरून वाद घातला त्यावेळी सर्व आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, भांडण वाढायला नको म्हणून फिर्यादी यांनी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक आरोपी तुषार व आरोपी सगून याने त्यांच्याकडे असलेल्या लोखंढी हत्याराने फिर्यादी यांच्या पायावर आणि पाठीवर मारहाण केली यामध्ये फिर्यादी यांना दुखापत झाली. याचवेळी आरोपींनी परत तु आमच्या नादी लागल तर बघून घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढीत तपास पोलीस करत आहेत.