संग्रहित छायाचित्र
पुणे : भावासोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून लोखंडी हत्याराने मारहाण केल्याचा प्रकार पुण्यातील नऱ्हे भागातून समोर आला. ही घटना बुधवारी १५ जानेवारी रोजी केक कनेक्शन दुकानजवळ मानाजीनगर नऱ्हे येथे घडली.
याप्रकरणी ओमकार सचिन मोरे (वय २२, रा.हरीओम हाईटस्, फ्लॅट नं.२, दौलत लॉन्सजवळ, भुगाव) यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून सिंहगड रोड पोलिसांनी १) निलेश आदमाने (वय १७), २) लोकेश खेतमाळस (वय २१), ३) सुनिल पुरी (वय२४),४)तारू सर्व राहणार पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावासोबत आरोपींचे जुने भांडण होते. दरम्यान, बुधवारी फिर्यादी केक कनेक्शन दुकानजवळ मानाजीनगर आले असता याच भांडणाच्या रागातून लोखंडी हत्याराने फिर्यादी ओमकार यांच्यावर वार केले. हा मारहाणीत त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर, उजव्या हातावर आणि डोक्यावर मागील बाजूस गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.