संग्रहित छायाचित्र
पुणे : मानसिक विकृतीची अनेक उदाहरणे अनेकदा समोर येत असतात. यातील काही उदाहरणे म्हणजे अगदी किळसवाणी आणि संताप निर्माण करणारी असतात. अशीच एक घटना पुण्याच्या पश्चिम भागामधून समोर आली आहे. एका विकृताने गायीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गोठा मालकानेच हा प्रकार पाहिला. त्याने आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विकास अवध शर्मा (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा हा मोलमजुरी करणारा कामगार आहे. तो रहात असलेल्या परिसरात विविध प्रकारची कामे करतो. तर, फिर्यादी यांच्या मालकीचा गोठा आहेत. या गोठ्यात गायी देखील आहेत. आरोपी अधून मधून या गोठ्याच्या परिसरात येत असायचा. तसेच, कधी कधी गोठ्यात देखील जायचा. गायींच्या जवळ त्याचे सतत घुटमळणे पाहून फिर्यादीला संशय देखील आलेला होता. मात्र, असे काही असेल असा विचार त्यांच्या मनात नव्हता.
सोमवारी (दि. १३ जानेवारी) रात्री गोठा मालक तरुण गोठ्याचे दार बंद करण्याकरिता गेला होता. त्यावेळी आरोपी एका गाईच्या पाठीमागे उभा असलेला त्यांना दिसला. त्यांनी तिकडे जाऊन पाहिले असता समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. त्यावेळी आरोपी गाईसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करीत असताना आढळून आला. त्यांनी कुटुंबीयांना आवाज देऊन बोलावून घेतले. आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला गुन्हा दाखल करीत बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकारामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
काही वर्षांपूर्वी नारायण पेठेमध्ये अशीच एक घटना घडली होती. एका व्यक्तीने भटक्या श्वानाला पकडून आणत त्याच्यावर बलात्कार केला होता. त्याने अनेकदा हे प्रकार केले होते. मात्र, एका सजग तरुणाच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार उघड झाला होता. या आरोपीला अटक करण्यात आली होती.