फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थाचा वसतीगृहात गळफास
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरूवारी (दि. २७) रात्री ही घटना घडली आहे. मात्र, तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
ओम कापडणे (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो फर्ग्युसन महाविद्यालयात बी. एस्सीच्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, ओम हा मुळचा नाशिक जिल्ह्यातील आहे. पुण्यातील वराडवाडी परिसरात असेलल्या विष्णू कुंज या वसतीगृहात राहत होता.
ओमने विष्णू कुंज या वसतीगृहातच गुरूवारी रात्री गळफास घेतला. मात्र, त्याने हे पाऊस का उचलले, याबाबत अद्याप कोणतेही कारण समोर आलेले नाही. याशिवाय, घटनास्थळी कुठलीही चिठ्ठी मिळून आली नाही. या घटनेची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चतु:शृंगी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.