पुणे : बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना पुण्यातील शिवणे परिसरात घडलीय. प्रथमेश कुसाळकर असे या मुलाचं नाव आहे. सायकलवर खेळत असताना तो थेट खड्ड्यात जाऊन पडला.

Pune News

पुणे : बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

पुणे : बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना पुण्यातील शिवणे परिसरात घडलीय. प्रथमेश कुसाळकर (Prathamesh Kusalka) असे या मुलाचं नाव आहे. सायकलवर खेळत असताना तो थेट खड्ड्यात जाऊन पडला. त्यात त्याच्या चेहऱ्याला मोठी दुखापत झाली आहे. (Pune News)

खोदकाम केलेल्या खड्ड्याभोवती कुठल्याच प्रकारचे पत्रे अथवा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपायोजना करण्यात आलेल्या नाहीयेत.संबंधित बांधकाम व्यवसायिकाच्या बेदरकारपणामुळे अपघात घडल्याचं मुलाच्या पालकांच म्हणणं आहे. यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार असून  दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

शहरात वाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी कोणतीही सुरक्षीतता पाळली जात नाही त्यामुळेच अशा घटना घडताना दिसत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest