Prostitution : विमाननगर परिसरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोन तरुणींची सुटका

पुण्यातील विमाननगर परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा टाकून दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर आरोपी दलालाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 13 Oct 2023
  • 12:29 pm
Prostitution  : विमाननगर परिसरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोन तरुणींची सुटका

विमाननगर परिसरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोन तरुणींची सुटका

परराराज्यातील मुलींना बोलावून जादा पैशांच्या आमिष दाखल वेश्याव्यवसाय करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा टाकून दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर आरोपी दलालाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे.

दीपक शरयू यादव (वय २८, रा. चंदननगर, मूळ रा. झारखंड) आणि रवी अशी गुन्हा दाखल केलेल्या दलालांची नावे आहे. या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागातील हवालदार तुषार भिवरकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक आणि रवी हरियाणा, उत्तर प्रदेशमधील महिलांना व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क करुन जास्तीच्या पैशांचे अमिष दाखवुन वेश्याव्यवसायासाठी पुणे शहरात बोलावुन घेत होते.

दीपक आणि साथीदार रवि ऑनलाइन पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवित होते. समाजमाध्यमात तरुणींचे छायाचित्रे प्रसारित करायचे. सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. पैसे दिल्यानंतर तरुणीने विमाननगर भागातील हॉटेलमध्ये बोलावून घेतले जायचे. याबाबतची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील तुषार भिवरकर आणि अमेय रसाळ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून विमाननगर येथील एका हॉटेलमध्ये दोन रुम बूक करण्यात सांगितले.

त्यानंतर वेश्याव्यवसायासाठी तरुणी येताच छापा टाकून पोलीसांनी दोघींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूर केल्यानंतर चंदननगर परिसरात दीपक आणि त्याच्या साथीदार रवि मिळून आले. पोलीसांना दोघांना ताब्यात घेतले. तर दोन्ही पीडित तरुणींची सुटका केली. आरोपींविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात कलम ३७०, ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ४५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला  आहे. या प्रकरणाचा अधिक तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest