चिखलीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, ३० वर्षीय महिलेची सुटका
पिंपरी चिंचवड पोलीसांनी चिखली येथील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एकाचा जणाना अटक करण्यात आली आहे. तर एका महिलेसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका ३० वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली आहे.
रामेश्वर प्रभाकर मुळे (वय २४, रा. फ्लॅट नं ३०१, तिसरा मजला, आर्यन लॅन्डमार्क, जाधववाडी, चिखली पुणे मुळ रा. मालगाव ता. आंबड जि. जालना) असे अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर तुषार जाधव याच्यासह एका महिलेवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३० वर्षीय महिलेला पैशांचे आमिष दाखवून आरोपींनी वेश्याव्यवसाय करण्यात भाग पाडले. यावेळी ते आरोपी तुषार जाधव यांच्या चिखलीत असलेल्या जाधववाडी येथील फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय चालवत होते. महिलेला आमिष दाखवून आरोपी वेश्याव्यवसायातून येणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह करत होता. अखेर पोलीसांनी छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी रामेश्वर मुळेला अटक केली आहे. तर तुषार जाधव आणि एका महिलेविरोधात कलम ३७० (२), ३४ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.