प्रदीप कुरुलकरांचा दोन महिलांवर अत्याचार, एटीएसच्या दोषारोपपत्रातील आरोपाने खळबळ
डीआरडीओचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. कुरूलकर यांच्या विरोधात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दोषारोपत्र दाखल केले आहे. मात्र, यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुरुलकरांनी दोन महिलांवर अत्याचार केला, अशी माहिती न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात देण्यात आली आहे.
राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कुरुलकर यांच्याविरुद्ध एक हजार ८३७ पानांचे दोषारोपपत्र नुकतेच दाखल केले. कुरुलकर यांनी दोन महिलांना डीआरडीओतील कामे मिळवून देण्याच्या आमिषाने दोन महिलांवर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. कुरुलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर एटीएसच्या पथकाने दोन महिलांची चौकशी केली होती. कुरुलकर यांनी दोन महिलांना डीआरडीओच्या विश्रामकक्षात बोलावले होते. महिलांचे जबाब एटीएसच्या पथकाने नोंदवून घेतले होते.
एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात कुरुलकर यांनी दोन महिलांचे शोषण केल्याचा आरोप ठेवला आहे. दरम्यान, कुरुलकर यांनी महिलांना नोकरीचे आमिष दाखवले होते. आमिष दाखवून त्यांना स्वच्छता गृहात बोलावले. त्याच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एटीएसने दोषारोपत्रात केला आहे.