संग्रहित छायाचित्र
हिंजवडी परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्यव्यवसायाचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने २१ जून रोजी केली आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर मसाज सेंटर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल नवनाथ कांगणे (वय २८, रा. सुनिल कसाळे यांची रुम, सुतार वस्ती, माण ता. मुळशी जि. पुणे मुळ पत्ता - मु. कुणकी ता. जळकोट जि. लातुर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल हिंजवडी परिसरात असलेल्या Luminous SPA शॉप नं २०६, दुसरा मजला, सुरतवाला मार्क प्लाझा या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात असलेल्या Luminous SPA मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी सुरूवातीला खात्री करण्यासाठी बनावट ग्राहक पाठवला. त्यानंतर सापळा रचून वेश्याव्यवसायावर छापा टाकला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका कऱण्यात आली आहे. तर वेश्याव्यवसाय चालक राहुल कांगणे यांच्यावर कलम ३७० (३) सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.