हडपसर : गावठी हातभट्टीच्या गुन्ह्यातील महिला आरोपीवर स्थानबद्धतेची कारवाई

पुण्यातील हडपसर परिसरात गावठी हातभट्टी दारुच्या गुन्ह्यातील अट्टल महिला आरोपीवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. मागिल ५ वर्षात आरोपी महिलोविरोधात ८ गुन्हे दाखल झाले होते. अखेर गुन्हे शाखेच्या पीसीबी पथकाने महिलेवर कारवाई केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 11 Aug 2023
  • 01:09 pm
Hadpasar : गावठी हातभट्टीच्या गुन्हायातील महिला आरोपीवर स्थानबद्धतेची कारवाई

Hadpasar : गावठी हातभट्टीच्या गुन्हायातील महिला आरोपीवर स्थानबद्धतेची कारवाई

हडपसर परिसरात पसरवली होती दहशत

पुण्यातील हडपसर परिसरात गावठी हातभट्टी दारुच्या गुन्ह्यातील अट्टल महिला आरोपीवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. मागिल ५ वर्षात आरोपी महिलोविरोधात ८ गुन्हे दाखल झाले होते. अखेर गुन्हे शाखेच्या पीसीबी पथकाने महिलेवर कारवाई केली आहे.

सुमन संजय कडमंची (वय ४१, रा. समर्थनगर हिंगणे मळा हडपसर, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. पीसीबी पथकाने केलेली ही ३९ वी स्थानबद्धतेची कारवाई आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सुमन ही तीच्या साथीदारांसह हडपसर परिसरात बेकायदेशीर भेसळयुक्त ताडी विक्री करणे, गावठी दारू विक्री करणे, यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करत होती. मागील ०५ वर्षामध्ये तिच्याविरोधात ८ गुन्हे दाखल झाले होते.

तिच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील नागरीकांच्या आरोग्यास व जीवीतास धोका निर्माण होवून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. महिलेच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. त्यामुळे, अखेर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest