Pune Crime News: गुन्हेगारांचे थेट पोलिसांनाच आव्हान; मतदान संपताच वारज्यात गोळीबार

पुणे : लोकसभेच्या निवडणुकीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला असताना तसेच गुन्हेगारांकडे तपासणी, बेकायदा शस्त्र जप्ती अशा कारवाया सुरू असताना देखील गुन्हेगार पोलिसांनाच आव्हान देत असल्याचे चित्र आहे.

संग्रहित छायाचित्र

दुचाकीवरुन आलेल्यांकडून हवेत ‘फायरिंग’

पुणे : लोकसभेच्या निवडणुकीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला असताना तसेच गुन्हेगारांकडे तपासणी, बेकायदा शस्त्र जप्ती अशा कारवाया सुरू असताना देखील गुन्हेगार पोलिसांनाच आव्हान देत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी बारामती लोकसभा मतदार संघासाठीचे (Baramati Lok Sabha) मतदान संपल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. ही घटना वारजे (Warje) येथील रामनगर  परिसरात असलेल्या शक्ती चौकात रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या वारजे परिसरात मंगळवारी संध्याकाळी मतदान संपले. दिवसभरातील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर रात्री रामनगरमध्ये गोळीबार झाला. या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी कळवली. वारजे आणि गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी शक्ती चौकात रात्री पावणेअकराच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना दिली. या गोळीबारामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. गोळीबार केल्यानंतर आरोपी मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गाने कात्रजच्या दिशेन पसार झाले. पोलिसांकडून आसपासचे सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे. तसेच, आरोपींचा माग काढण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest