Pune Crime News : पंचवटी सोसायटीची जागा सांगितली स्वतःची, हजारो रुपये घेत तरुणाची फसवणूक

धनकवडी येथील पंचवटी सोसायटीच्या समोर असलेली सोसायटीच्या मालकीची जागा स्वतःच्या मालकीची आह, असे सांगत एका तरुणाबरोबर भाडेकरार करून ७४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News : पंचवटी सोसायटीची जागा सांगितली स्वतःची, हजारो रुपये घेत तरुणाची फसवणूक

पंचवटी सोसायटीची जागा सांगितली स्वतःची, हजारो रुपये घेत तरुणाची फसवणूक

पुणे : धनकवडी येथील पंचवटी सोसायटीच्या समोर असलेली सोसायटीच्या मालकीची जागा स्वतःच्या मालकीची आह, असे सांगत एका तरुणाबरोबर भाडेकरार करून ७४ हजार रुपयांची  फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ मे २०२२  ते 9९ जुलै २०२२ या कालावधी दरम्यान घडला.

रामदास छगन लगड (वय ४२) आणि मनीषा रामदास लगड (दोघेही रा. दत्तनगर चौक, आंबेगाव रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी लखन शशिकांत निकाळजे (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे. धनकवडी येथील चव्हाण नगरमध्ये पंचवटी सोसायटी आहे. या सोसायटीच्या समोर मोकळी जागा असून ती सोसायटीच्या मालकीची आहे. आरोपी लगड दांपत्याने ही जागा त्यांच्या मालकीची आहे असे भासवले.

फिर्यादी निकाळजे यांच्यासोबत भाडेकरार केला. त्यांना डिपॉझिट आणि भाड्याचे पैसे तसेच शेडला लागणारे साहित्य असे एकूण ७४ हजार रुपये घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदेश देशमाने करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest