Pune Crime : बाप्पांच्या स्वागतासाठी तेरा वर्षीय मुलीने केला 'तो' हट्ट, आईने विरोध केल्यास उचलले टोकाचे पाऊल

गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सकाळी लवकरच साडी नेसण्याचा हट्ट करणाऱ्या तेरा वर्षीय मुलीला आईने विरोध केला. याचा राग अनावर झाल्याने मुलीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 22 Sep 2023
  • 11:35 am
Pune Crime

संग्रहित छायाचित्र

रोहित आठवले

गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सकाळी लवकरच साडी नेसण्याचा हट्ट करणाऱ्या तेरा वर्षीय मुलीला आईने विरोध केला. याचा राग अनावर झाल्याने मुलीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी 

(१९ सप्टेंबर) ही धक्कादायक घटना दत्तनगर, किवळे येथे घडली आहे. त्यामुळे बाप्पाला आणायची तयारी करणाऱ्या कुटुंबावर मुलीच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्याची दुर्दैवी वेळ आली.

सुश्मिता पिंटू प्रधान ( वय १३, रा, देहुरोड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देहूरोड-किवळे परिसरात बाप्पांच्या आगमनाची धामधूम सुरू होती. प्रधान कुटुंबीयांची देखील गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची लगबग होती. सुश्मितासह तिची मोठी बहीण आणि लहान भाऊ असे तिघेजण सकाळपासूनच बाप्पांच्या आगमनाची तयारी करीत होते. गणेशाच्या आगमनाची सुश्मिताला मोठी उत्सुकता होती. त्यासाठी तिने सकाळीच आईकडे साडी नेसण्याचा हट्ट केला होता. साडी नेसून नटून थटून तिला बाप्पांचे स्वागत करायचे होते. मात्र, एवढ्या सकाळी साडी नेसवण्यास आईने विरोध केला. त्यामुळे सुश्मिता नाराज झाली होती. दरम्यान, दुपारी सुश्मिताची मावशी आणि काका घरी आले होते. त्यावेळी देखील सुश्मिताने साडी नेसण्याच्या आग्रह केला. एका विशिष्ट पद्धतीची साडी नेसण्यासाठी तिने हट्टच धरला. त्यावेळी कुटुंबीयांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुश्मिता चिडून बाथरूममध्ये गेली. बराच वेळ सुश्मिता बाहेर न आल्याने तिच्या मोठ्या बहिणीने बाथरूमचे दार ठोठावले. मात्र, सुश्मिताने आतून काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने बाहेर जाऊन खिडकीतून डोकावून पाहिले. त्यावेळी तिला सुश्मिता लटकलेल्या अवस्थेत दिसून आली.

त्यानंतर कुटुंबीयांनी बाथरूमचा दरवाजा तोडून सुश्मिताला खाली उतरवून तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी सुश्मिताचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. सुश्मिता देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयात इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. सुश्मिता अतिशय बोलकी आणि चुणचुणीत मुलगी होती. रविवारी रात्री तिने शेजाऱ्यांशी छान गप्पा देखील मारल्या होत्या. तिच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest