Pune Crime News : ऐन सणासुदीला एक खून, तीन ठिकाणी खुनाचा प्रयत्न

ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये गुन्हेगारीला पुणे शहरात उत आला आहे. चंदन नगर येथील वडगाव शेरीमध्ये किरकोळ कारणावरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली असतानाच तीन ठिकाणी खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटना घडल्या.

Pune Crime News : ऐन सणासुदीला एक खून, तीन ठिकाणी खुनाचा प्रयत्न

ऐन सणासुदीला एक खून, तीन ठिकाणी खुनाचा प्रयत्न

पुणे : ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये गुन्हेगारीला पुणे शहरात उत आला आहे. चंदन नगर येथील वडगाव शेरीमध्ये किरकोळ कारणावरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली असतानाच तीन ठिकाणी खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी भारती विद्यापीठ, हडपसर आणि मार्केट यार्ड पोलीस ठाण्यामध्ये तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तेजस महादेव खाटपे (वय १९, रा. राम मंदिराजवळ, आंबेगाव बुद्रुक), इमरान शेख (रा. संतोष नगर, कात्रज) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ गंगाराम पवार (वय ४३, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. पवार हे कात्रज भाजी मंडई जवळ असलेल्या माऊली मेडिकल समोर थांबलेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना एकटे गाठले. महिन्याभरापूर्वी दारू पिताना पवार यांनी खाटपे आणि शेख या दोघांना हाकलून दिलेले होते. त्याचा राग मनात धरून धारदार हत्याराने या दोघांनी पवार यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

तर, हडपसर पोलीस ठाण्यामध्ये अजय सिंग पोलाद सिंग टाक (वय २३) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चंदनसिंग तारासिंग जुनी यांनी फिर्याद दिली आहे. चंदन सिंग यांचा मुलगा गणेश आणि अजय सिंग या दोघांमध्ये वाद झाला होता. त्या रागामधून आरोपीने 'तुला लय माज आला आहे. तु आमच्या सोबत भांडण करतो. आज तुझा गेम करतो. तुला कायमचा संपवतो.' असे म्हणत गणेश याला हाताने मारहाण केली आणि नंतर त्याच्या जवळ असलेल्या चाकूने गळ्यावर पोटावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना हडपसर येथील वैदुवाडीमध्ये घडली.

मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात संयम फिरोज खान (वय २०), शाहरुख सलीम खान (वय २१), साहिल (सर्व रा. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड) यांच्या विरोधात प्राण घातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुमार राम कांबळे (रा. आंबेडकर नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी कांबळे आणि त्यांचा मित्र प्रथमेश हे मार्केट यार्डच्या ११ नंबरच्या गल्लीमध्ये फटाके फोडत होते. त्यावेळी आरोपींनी त्या ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई केली आणि शिवीगाळ केली. तसेच, त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने दोघांच्या डोक्यात वार करून त्यांच्यावर हल्ला केला. तसेच, हवेत कोयते नाचवेत दहशत निर्माण केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest