Dighi : लग्न मांडवातून एक लाख रुपयांचा ऐवज चोरीला

वडमुखवाडी येथील एका लॉन्स वरून लग्न घाईत चोराने एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शनिवारी (२४ नोव्हेंबर) रात्री वडमुखवाडी येथील चंद्रपूर लॉन्स येथे ही घटना घडली.

Dighi : लग्न मांडवातून एक लाख रुपयांचा ऐवज चोरीला

लग्न मांडवातून एक लाख रुपयांचा ऐवज चोरीला

वडमुखवाडी येथील एका लॉन्स वरून लग्न घाईत चोराने एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शनिवारी (२४ नोव्हेंबर) रात्री वडमुखवाडी येथील चंद्रपूर लॉन्स येथे ही घटना घडली.

या प्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात रविवारी (२६ नोव्हेंबर) फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी ३० ते ३५ वर्षांच्या अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर लॉन्स येथे वर पक्षाच्या रूममध्ये फिर्यादी यांची पर्स होती. या पर्समध्ये पंचावन्न हजार रुपयांचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ७० हजार रुपये रोख असा एक लाख २५ हजार रुपयांचा ऐवज होता. चोराने गर्दीचा फायदा घेत रूममध्ये जाऊन फिर्यादी यांची पर्स चोरून नेली,या प्रकरणी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest