Pimpri Chinchwad Crime : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

पिस्टल बाळगल्या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (MIDC Bhosari Police) एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास यशवंत चौक, एमआयडीसी भोसरी येथे करण्यात आली. (Crime News)

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

पिस्टल बाळगल्या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (MIDC Bhosari Police) एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास यशवंत चौक, एमआयडीसी भोसरी येथे करण्यात आली. (Crime News)

सुरज प्रदीप शिंदे (Suraj Shinde) (वय 24, रा. राजवाडा, इंद्रायणी नगर, भोसरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी मधील यशवंत चौकात एक तरुण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन सुरज शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळले. पिस्टल जप्त करत पोलिसांनी त्याला अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest