Pune Crime News : ऐन दिवाळीत केला खून, कुक झाला गजाआड

दारू पिताना झालेल्या किरकोळ वादा मधून एकाने मित्राला इमारतीच्या टेरेसवरून खाली फेकत त्याचा खून केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरी येथील संजय गांधी (Sanjay Gandhi Society) सोसायटीमध्ये घडली. याप्र

Pune Crime News : ऐन दिवाळीत केला खून, कुक झाला गजाआड

ऐन दिवाळीत केला खून, कुक झाला गजाआड

पुणे : दारू पिताना झालेल्या किरकोळ वादा मधून एकाने मित्राला इमारतीच्या टेरेसवरून खाली फेकत त्याचा खून केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरी येथील संजय गांधी (Sanjay Gandhi Society) सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandannagar police) ४७ वर्षीय आरोपीला अटक (Arrested) केली आहे.

बैजू लक्ष्मी मंडल (वय ३५, रा. वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शंभू दपी राम (वय ४७) याला अटक करण्यात आली आहे. संतोष कोंडीबा गिनलवाड (वय ३२) असे यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शंभू राम आणि बैजू मंडल हे दोघेही पश्चिम बंगालचे राहणारे आहेत. ते मागील पाच-सहा वर्षांपासून पुण्यामध्ये कुटुंबासह राहतात. शंभू राम हा पंचशील टॉवर्स मध्ये पाच-सहा घरांमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतो. तर,खून झालेला बैजू मंडल हा रेशन दुकानामध्ये काम करीत होता.

सोमवारी रात्री आरोपी आणि बैजू हे दोघेही इमारतीच्या टेरेसवर दारू पीत बसले होते. बैजू याने एकदा रेशन दुकानदाराला शंभूबद्दल तक्रार केली होती. त्याला उधारीवर किराणा देऊ नको. तो पैसे देत नाही, असे सांगितले होते. त्या रागातून या दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावरण दोघांच्या हाणामारीत झाले. एकमेकांना धक्काबुक्की करीत असतानाच शंभूने त्याची गचंडी पकडली आणि त्याला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. गंभीर जखमी झालेल्या बैजू मंडल याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest