सोशल मीडियावरही शुक... शुक..!, फेसबुक, व्हाॅट्स ॲॅपवर 'रेट कार्ड' जाहीर करीत पोलिसांना आव्हान

सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करीत शुक...शुक..!, करणाऱ्या महिलांसोबतच आता ऑनलाईन चालणारे सेक्स रॅकेट पोलिसांची डोकेदुखी ठरू लागले आहे.

Sex racket

संग्रहित छायाचित्र

सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करीत शुक...शुक..!, करणाऱ्या महिलांसोबतच आता ऑनलाईन चालणारे सेक्स रॅकेट पोलिसांची डोकेदुखी ठरू लागले आहे. काहीजणांनी तर फेसबुक, व्हाॅट्स ॲपवर 'रेट कार्ड' व्हायरल करीत पोलिसांना खुले आव्हान दिले आहे.

नुकतेच एक 'रेट कार्ड' सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यावर सर्व्हिस, पैसे, वेळ, ॲडव्हान्स, अशा वेगवेगळ्या कॉलममध्ये माहिती देण्यात आली आहे. यातील कोणतीही सर्व्हिस मिळवण्यासाठी आधी ऑनलाईन पैसे पाठवावे लागतात. त्यानंतरच प्रतिसाद दिला जातो. यामध्ये बहुतांश जणांची फसवणूक होत आहे. मात्र, बदनामीच्या भीतीने कोणीही तक्रार देत नाहीत. त्यामुळे पोलीसही दलालांच्या या रॅकेटपासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे आगामी काळात पोलिसांना वेश्याव्यवसाय रोखण्यासाठी हद्दीतील अड्ड्यांसोबत सोशल मीडियावर देखील 'वॉच' ठेवावा लागणार आहे.

उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या दलालांची मुस्कटदाबी केली आहे. मागील साडेचार महिन्यांत  तब्बल ४१ ठिकाणी सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आल्याची नोंद आहे. यातील विशेष बाब म्हणजे दहा उच्चभ्रू सोसायट्यांत घुसून पोलिसांनी मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे पोलिसांपासून लपण्यासाठी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दलालांनी आता व्हाॅटस ॲप आणि फेसबुकचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.

जाळ्यात अडकणाऱ्यांचे प्रमाण अधिक

दलालांनी व्हायरल केलेल्या रेट कार्डमध्ये व्हीडीओ कॉलवर बोलण्याचा पर्याय नमूद आहे. पंधरा मिनिटांसाठी ३०० रुपये दर ठेवण्यात आला आहे. यामध्ये आंबटशौकीन मंडळी जास्त प्रमाणात अडकत आहेत.

जाहिरातीसाठी दाक्षिणात्य अभिनेत्री

सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी दलालांनी दाक्षिणात्य सिनेमात काम करणाऱ्या छोट्या महिला कलाकारांचे फोटो वापरले आहेत. फोटो पाहून अनेक तरुण याकडे आकर्षित होतात. अनेकांना आपली फसवणूक होण्याची भीती वाटते. मात्र, तरी देखील कॉलवर बोलणारी महिला एक प्रकारे संमोहित करत असल्याचे तरुण नाव न छापण्याच्या सांगतात.

ब्लॅकमेलिंगचा धोका मोठा

नग्न अवस्थेत व्हीडीओ कॉल करून स्क्रीन रेकॉर्डिंगद्वारे व्हीडीओ बनवला जातो. त्यानंतर 'तो'  व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जाते. बदनामीच्या भीतीने अनेकांच्या खिशाला यापूर्वी कात्री लागली आहे. त्यामुळे तरुणांनी भान राखणे गरजेचे आहे.

वेश्याव्यवसायाचा समूळ नाश करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. ऑनलाईन पद्धतीने सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दलालांवरही यापूर्वी कारवाई करण्यात आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या जाहिराती दिसल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

-देवेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पिंपरी- चिंचवड

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest