उपायुक्त अमोल झेंडे
पुणे शहराला विद्येचे माहेर घर म्हटले जाते. मात्र याच शहरात अनेक तरुण अंमली पदार्थांच सेवन करत आहेत. जानेवारी २०२३ ते मे २०२३ या काळात शहरातील अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. या ५ महिन्यात तब्बल ७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेमधील नार्कोटेक्स सेल वन नार्कोटेक्स सेल टू या दोन विभागांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे.
अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांच्या संख्येत ज्या पद्धतीने वाढ झाली आहे. त्याच पद्धतीने यामध्ये तस्करी करणाऱ्या आरोपींच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. यामुळेच पुणे पोलिसांनी आतापर्यंत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ५० आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींमध्ये शहरातील तसेच परराज्यातील आरोपींचा देखील समावेश आहे.
यामध्ये कोकेण, ब्राऊन शुगर, एलएसडी स्टॅम्प व मेफेड्रोन या अंमली पदार्थांचा समावेश आहे. हे अंमली पदार्थ शरीरास घातक असून यामुळे कर्करोग देखील होऊ शकतो. त्यामुळे शहरातील तरुणांनी अंमली पदार्थांचे सेवन करू नये, असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.