मोबाईल फोडल्याच्या कारणावरून युवकाचा खून

चाकण : मोबाईल फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन परप्रांतीयांमध्ये झालेल्या भांडणातून तेवीस वर्षीय युवकाचा गळा आवळून आणि डोक्यात लोखंडी तवा मारुन खून केल्याची घटना महाळुंगे इंगळे (ता.खेड ) येथे (दि.२९) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.

संग्रहित छायाचित्र

वैष्णवी मांडेकर 
चाकण : मोबाईल फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन परप्रांतीयांमध्ये झालेल्या भांडणातून तेवीस वर्षीय युवकाचा गळा आवळून आणि डोक्यात लोखंडी तवा मारुन खून केल्याची घटना महाळुंगे इंगळे (ता.खेड ) येथे (दि.२९) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. 

कालू मंगल रकेवार (वय २३ वर्ष, सध्या रा.महाळुंगे, मुळ रा.पथरीया, ता.जि.दमुही, मध्यप्रदेश ) असे खून करण्यात आलेल्या युवकाचा नाव आहे.

याप्रकरणी पप्पू मंगल रकवार ( वय. ४० वर्ष, सध्या रा.महाळुंगे, ता.खेड, जि.पुणे, मूळ रा.पथरीया, ता.जि. दमूही, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामसिंग (वय ३० वर्ष, रा. रेवाना ता.जि.दमुही मध्यप्रदेश) याच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू, कालू आणि राम सिंग हे तिघे परप्रांतीय चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत ठेकेदारीवर काम करत असून, एकाच भाड्याच्या खोलीत महाळुंगे इंगळे येथे एकत्र राहत आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी कालू याने राम सिंग याचा मोबाईल फोडला होता. यावरून दोघांमध्ये (दि.२८) ला जोरजोराने भांडणे सुरू होती. पप्पू हा खोलीवर रात्री दहाच्या सुमारास गेला असता, कालू रकेवार हा खाली जमिनीवर पडलेला होता आणि त्याच्या छातीवर रामसिंग बसून कालूच्या गळ्याभोवती गुलाबी रंगाचा फेट्याचा कपड्याने डावे हाताने गळा दाबत होता आणि उजव्या हातातील लोखंडी तव्याने कालूच्या डोक्यात मारून खून केला आहे. फरारी आरोपीचा तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest