चाकण, हिंजवडी, वाकडच्या तीन टोळ्यांवर मोक्का कारवाई

चाकण, हिंजवडी आणि वाकड परिसरातील पवार, ढमाले व राजपूत या तीन टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 29 Jun 2024
  • 01:45 pm

संग्रहित छायाचित्र

चाकण, हिंजवडी आणि वाकड परिसरातील पवार, ढमाले व राजपूत या तीन टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

चाकणमधील टोळीप्रमुख राहुल संजय पवार (वय ३३, रा. म्हाळुंगे इंगळे) आणि त्याचे पाच साथीदार, हिंजवडीतील टोळीप्रमुख सचिन तानाजी राजपूत (वय २६, रा. कासार आंबोली) व त्याचे तीन साथीदार, वाकडमधील टोळीप्रमुख अभिजित बाजीराव ढमाले (रा. सांगवी) व त्याचे दहा साथीदार यांच्या विरोधात मोक्काची कारवाई केली आहे.

या टोळीतील आरोपींविरोधात खून, खुनाचा कट रचणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी,  खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न, दुखापत, विनयभंग, जबरी चोरी असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तीनही टोळ्यांतील आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराच्या वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी वापर केला.

ही कारवाई साहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, कन्हैया थोरात, निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटोळे यांच्या पथकाने केली.

Pimpri Chinchwad Crime News

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest