PCMC : मनाविरूद्ध मुलाला जन्म दिल्याने होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पतीचा विरोध असतानाही विवाहितेने मुलाला जन्म दिला म्हणून पती व तीच्या सासरच्या मंडळीने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. सासरच्या या छळाला कंटाळून विवाहित देणे राहत्या घरी गळफास घेतला.

PCMC : मनाविरूद्ध मुलाला जन्म दिल्याने होणाऱ्या छळाला, कंटाळून विवाहितेची आत्महत्या

संग्रहित छायाचित्र

पतीचा विरोध असतानाही विवाहितेने मुलाला जन्म दिला म्हणून पती व तीच्या सासरच्या मंडळीने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. सासरच्या या छळाला कंटाळून विवाहित देणे राहत्या घरी गळफास घेतला. शनिवारी (२५ नोव्हेंबर) भोसरी येथील गवळी नगर परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी भोसरी पोलिसांनी पती पवन प्रल्हाद तायडे (वय २९ रा. भोसरी) आणि घरातील एका महिलेला अटक केली आहे. तर सासरे प्रल्हाद लक्ष्मण तायडे (वय ६६) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडील रमेश रामभाऊ चोपडे (वय ५३, रा. बुलढाणा) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी (२६ नोव्हेंबर) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडे यांच्या मुलीला आरोपी हे मार्च २०२० पासून शारीरिक व मानसिक त्रास देत होते. फ्लॅट घेण्यासाठी माहेर वरून दहा लाख रुपये घेऊन ये, तसेच मनाविरुद्ध तू मुलाला जन्म का दिला या कारणावरून पीडितेला वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण केली जात होती. पती आणि इतरांच्या त्रासाला कंटाळून पीडीतेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest