Crime News : मारहाण करून नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील निघोजे येथे एका व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याचे कपडे काढत मोकळ्या जागेत नग्नावस्थेत सोडून दिले. त्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 29) घडली.

Crime News : मारहाण करून नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

मारहाण करून नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील निघोजे येथे एका व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याचे कपडे काढत मोकळ्या जागेत नग्नावस्थेत सोडून दिले. त्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 29) घडली.

मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. याप्रकरणी अज्ञातांच्या विरोधात खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अर्जुन सोनटक्के यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोजे गावात विजयकुमार शिंगवे यांच्या जागेत एक जखमी व्यक्ती नग्नावस्थेत पडला असल्याची माहिती बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास महाळुंगे पोलिसांना मिळाली. त्यानुसार महाळुंगे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 30 ते 35 वर्ष वयोगटातील व्यक्तीला अज्ञातांनी डोक्यावर आणि शरीरावर ठिकठिकाणी टणक वस्तूने मारून गंभीर जखमी केले होते.

मारहाण केल्यानंतर व्यक्तीची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी जखमी व्यक्तीचे सर्व कपडे काढून त्याला नग्नावस्थेत फेकून दिले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला महाळुंगे पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्यात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest