Suicide : प्रियकराचा लग्नाला नकार; प्रेयसीची आत्महत्या

हिंजवडी येथे राहणाऱ्या तरुणीने आत्महत्या Osuicide) केली. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली असून याप्रकरणी 21 नोव्हेंबर रोजी हिंजवडी पोलीस (Hinjewadi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (

Suicide

प्रियकराचा लग्नाला नकार; प्रेयसीची आत्महत्या

हिंजवडी येथे राहणाऱ्या तरुणीने आत्महत्या Osuicide) केली. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली असून याप्रकरणी 21 नोव्हेंबर रोजी हिंजवडी पोलीस (Hinjewadi Police)  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri chinchwad Crime)

आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव पाटील (Gaurav Patil) (रा. धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव पाटील आणि फिर्यादी हे वेगवेगळ्या जातीचे आहेत. तरीही गौरव याने फिर्यादी यांच्या मुलीसोबत मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवले. त्याने फिर्यादी यांच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास त्याने नकार दिला. या नैराश्यातून तरुणीने राहत्या खोलीत आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest