टेम्पोमधील २० किलो गांजा जप्त, दोन जणांना अटक
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून बेकायदेशीर गांजा वाहतूक करणाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ६ लाख ५० हजार रुपये किंमतीचा २० किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
अशोक भूजंग चव्हाण (वय ४३, रा. धामणी खालापूर ता. खालापूर जि. रायगड) आणि शंकर भगवान साळुंखे (वय ३०, रा. ठोंबरेवाडी लोणावळा ता. मावळ जि. पुणे) असे अटक कऱण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने टेम्पोतुन गांजा वाहतूक करणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे- मुंबई महामार्गावरील वरसोली या ठिकाणी सापळा रचून टेम्पो पकडला. टेम्पोमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन टेम्पोची झडती घेतली असता २० किलो गांजा आढळून आला आहे. पोलीसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.