Lohgaon : लोहगावच्या पेट्रोल पंपावर दरोडा

ऐन सणासुदीच्या काळात शहरात चोरी आणि दरोडाच्या घटना घडत आहेत. लोहगाव-वाघोली रस्त्यावरील एचपी पेट्रोल पंपावर चार जणांनी दरोडा टाकला. कामगारांना धमकाबत त्यांच्याकडील २८ हजार ८७० रुपयांची रोकड घेऊन हे चोरटे पसार झाले.

Lohgaon : लोहगावच्या पेट्रोल पंपावर दरोडा

लोहगावच्या पेट्रोल पंपावर दरोडा

पुणे : ऐन सणासुदीच्या काळात शहरात चोरी आणि दरोडाच्या घटना घडत आहेत. लोहगाव-वाघोली रस्त्यावरील एचपी पेट्रोल पंपावर चार जणांनी दरोडा टाकला. कामगारांना धमकाबत त्यांच्याकडील २८ हजार ८७० रुपयांची रोकड घेऊन हे चोरटे पसार झाले. ही घटना शनिवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राहुल भीमराव पिंगळे (वय २४, लोहगाव, वाघोली रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पिंगळे हे एचपी पेट्रोल पंपावर काम करतात. ते आणि त्यांचे सहकारी पंपावर काम करीत असताना ऑफिसमध्ये तोंडाला कपडा बांधून चार चोरटे घुसले. त्यांनी ऑफिसमध्ये प्रवेश केल्यानंतर लोखंडी हत्याराचा धाक दाखवला. जबरदस्तीने पिंगळे यांच्याकडील २८ हजार ८७० रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मोबाईलचे नुकसान करून सर्व आरोपी पसार झाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest