Instagram : एका 'इंस्टाग्राम आयडी'वरुन दोन कुटुंबात थेट हाणामारी

एका इंस्टाग्राम आयडीवरुन थेट हाणामारी झाल्याची घटना कोंढवा येथील मेहेक हाईट या सोसायटीमध्ये रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 10 Oct 2023
  • 04:06 pm
Instagram : एका 'इंस्टाग्राम आयडी'वरुन दोन कुटुंबात थेट हाणामारी

संग्रहित छायाचित्र

पुणे : दोन अल्पवयीन मैत्रिणींच्या पालकांमध्ये एका इंस्टाग्राम आयडीवरुन थेट हाणामारी झाल्याची घटना कोंढवा येथील मेहेक हाईट या सोसायटीमध्ये रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुक्साना वसीम शेख, वसीम शेख (दोघेही रा. मक्का मशीदीजवळ, कोंढवा), सलमान आणि १४ वर्षीय अल्पवयीन मुळीसह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सानिया साजीद बेग (वय २०) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी एकाच इमारतीत राहण्यास आहेत. फिर्यादी यांची लहान मुलगी आणि आरोपी रुक्साना आणि वसीम यांची मुलगी मैत्रीणी आहेत. या दोघेही नातेवाईकांकडे गेलेल्या होत्या. त्या परत आल्या असता आपापल्या घरी गेल्या. त्यांनी बुरखा परिधान केलेला होता. फिर्यादी यांच्या मुलीच्या बुरख्यामध्ये इंस्टाग्राम आयडी लिहिलेली चिठ्ठी सापडली. यासंदर्भात त्यांनी मुलीकडे विचारणा केली. त्यावेळी ही चिठ्ठी तिच्या मैत्रीणीची असल्याचे सांगितले.

त्यानुसार फिर्यादी या मुलीला घेऊन तिच्या मैत्रीणकडे गेल्या. तिला समजावून सांगत असतानाच त्यांचा वाद झाला. त्यानंतर थोड्या वेळाने रुक्साना आणि वसीम यांच्यासह त्यांच्या मित्रांनी फिर्यादीच्या घरी येऊन पुन्हा वाद घातला. वसीम याने ही चिठ्ठी फिर्यादीच्या मुलीची असल्याचे सांगून भांडणाला सुरुवात केली. या वेळी त्याने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करायला सुरुवात केली. सलमान याने  फिर्यादी महिलेच्या डोक्यात काचेचा ग्लास मारला. वसीम याने सफाईच्या मॉबच्या लोखंडी पाईपने हातावर पायावर मारून मारून जखमी केले. भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या फिर्यादी महिलेच्या आई व आजीला देखील मारहाण करण्यात आली. दरम्यान, हे प्रकरण कोंढवा पोलीस ठाण्यात पोचल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिरादार करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest