Pune Lalit Patil Drug Case : ललित पाटील ड्रग्स प्रकरण! डीन रुग्णांवर कधीच उपचार करत नाहीत मग...आमदार रविंद्र धंगेकरांचा सवाल

ललित पाटील ड्रग्स प्रकरण (Lalit Patil Drug Case)रोज एक नवं वळण घेताना दिसून येत आहे. दरम्यान कबसा विधानसभा मतदारसंघाीत काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangeka) यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjeev Thakur) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 27 Oct 2023
  • 05:13 pm
Lalit Patil Drug Case

ललित पाटील ड्रग्स प्रकरण! डीन रुग्णांवर कधीच उपचार करत नाहीत मग...आमदार रविंद्र धंगेकरांचा सवाल

ललित पाटीलवर ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर उपचार करत असल्याचे 'त्या' रजिस्टरमधून समोर; संजीव ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करा : आमदार धंगेकर

पुणे : ललित पाटील ड्रग्स प्रकरण  (Lalit Patil Drug Case)रोज एक नवं वळण घेताना दिसून येत आहे. दरम्यान कबसा विधानसभा मतदारसंघाीत काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangeka) यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjeev Thakur) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. ललित पाटीलवर डॉ. संजीव ठाकूर उपचार करत असल्याचे कैद्यांच्या नोंदी असलेल्या रजिस्टरमधून समोर आले. हेच रजिस्टर संजीव ठाकूर यांनी लपवले. डीन रुग्णांवर कधीच उपचार करत नाहीत ते फत्त यंत्रणेवर देखरेख करत असतात. संजीव ठाकूर यांच्या मदतीनेच ललित नऊ महिन्यापासून ससूनध्ये कार्यरत होता. असे आरोप करत संजीव ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करा तरचं या तपासाला गती मिळेल अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली आहे. 

आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, ड्रग्स तस्कर ललित पाटील नऊ महिन्यापासून ससूनमध्ये कार्यरत होता. त्याला सर्व सोयी सुविधा पुरण्याचे काम ससूनचे डीन संजीव ठाकूर यांनी केले. मी पहिल्याच दिवसांपासून म्हणत होतो की, संजीव ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तर या तपासाला गती मिळेल. आज ज्या पद्धतीने ललित पाटील ससूनमधून पळून गेला आणि पळून जाताना त्याच्यामध्ये कुठलेही आजारपण दिसून आले नाही. तो पुण्याहून नाशिकला गेला, धुळ्याला गेला, नागपूला गेला, गुजरातला गेला अन् मद्रासला सापडला. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने ड्रामा केला. या ड्राम्यामध्येच तो पोलिसांच्या संपर्कात होता. आदल्या दिवशी गृहमंत्र्यांनी सागिंतले तो सापडेल आणि दुसऱ्या दिवसी तो सापडला. याचाच अर्थ तो त्यांच्या संपर्कात होता. 

ललित स्वत: पोलीसांच्या स्वाधीन, पोलीसांनी त्याला पकडले नाही

ललित पाटील हा स्वत: पोलीसांच्या स्वाधीन झाला असून पोलीसांनी त्याला पकडले नसल्याचा गंभीर आरोपी आमदार धंगेकर यांनी केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी,डॉक्टर यांनी पैसा घेतला. ससूनमध्ये नऊ महिने त्याने ड्रग्स विकण्याचं काम केले आहे. याचाच अर्थ त्याने डीनला पैसै देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतली. सर्व कटामध्ये संजीव ठाकूर यांनी नऊ महिने ससून मध्ये ललितला बोगस पद्धतीने उपचाराच्या नावाखाली ठेवले. यासाठी करोडी रुपयांची माया ठाकूर यांनी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली आहे. 

ललित पाटीलवर ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर उपचार करत असल्याचे रजिस्टरमधून समोर

ड्रग माफिया ललित पाटीलवर ससुन रुग्णालयातील उपचार नक्की कोणत्या डॉक्टरांनी केले, याची माहिती देण्यास आजपर्यंत ससुनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांनी आजतागायत नकार दिला. डॉक्टर संजीव ठाकूर यांनी गोपनीयतेच्या नावाखाली ही माहिती आतापर्यंत कोणालाच दिलेली नाही. मात्र, ससूनमधे उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे रजिस्टर हाती लागले तेव्हा त्यामध्ये उपचार घेणाऱ्या आरोपी रुग्णाचे नाव, त्याच्यावर कोणत्या आजारांवर उपचार सुरु आहेत, त्या आजाराचे नाव आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावाची सुरुवातीचे अक्षरं लिहिण्यात आले आहेत. या रजिस्टरमधील नोंदीनुसार ललित अनिल पाटील याच्यावर हर्नियाच्या आजारासाठी उपचार सुरु होते आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव एस. एस. टी. आहे. मात्र, हे डॉ. एस. एस. टी. हे दुसरे तिसरे कोणी नसून ससूनचे डीन डॉक्टर संजीव शामराव ठाकूर हे स्वतःच आहेत.  त्यामुळे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याच शिफारशीवरून ललित पाटील ससूनमधे तळ ठोकून होता हे सिद्ध होत आहे.

महिला पोलीस अधिकारी निलंबित

ड्रग्ज तस्कर ललित पाटील हा ससूनमधून पळून गेल्याप्रकरणी आज एका महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. सविता हनुमंत भागवत असे या सहायक पोलीस निरीक्षक महिलेचे नाव आहे. ससूनच्या १६ नंबर वॉर्डमध्ये लक्ष ठेवण्याची जबाबदारी असताना देखील त्यामध्ये कसूर केल्याचा ठपका पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांनी ठेवला आहे. ३० सप्टेंबर रोजी दिवसपाळी असतानाही कर्तव्यावर हजर न राहता केवळ अर्धा तास उपस्थित राहिल्यामुळे ललितला एक अज्ञात व्यक्ती भेटली आणि त्यानंतर तो पसार झाला. त्यामुळे कर्तव्यातील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे आरोपी ललित अनिल पाटील याला पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पळून जाण्यास संधी मिळाली, असे नमूद करीत निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हे आदेश काढले आहेत. यापूर्वी दोन अधिकाऱ्यांसह नऊ पोलिसांना निलंबित करण्यात आले होते.  

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest