Lalit Patil : ललित पाटील कारागृहात अटकेत, पण नावापुरताच...; धक्कादायक फोटो आले समोर

धुम ठोकण्याअरोदर ललित पाटील २०२० पासून येरवडा कारागृहात अटकेत होता. पण ललित पाटील कारागृहात नावापुरताच असल्याचे समोर आले आहे. कारण ललित पाटीलचे याच काळातील अतिशय धक्कादायक फोटो समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 19 Oct 2023
  • 05:53 pm
Lalit Patil : ललित पाटील कारागृहात अटकेत, पण नावापुरताच...; धक्कादायक फोटो आले समोर

ललित पाटील कारागृहात अटकेत, पण नावापुरताच...

ससून रुग्णालयातून पुणे पोलीसांच्या हातावर तुरी देत धुम ठोकलेल्या ड्रग्ज माफिया ललील पाटीलला मुंबई पोलीसांनी चेन्नईतून अटक केली आहे. मात्र, धुम ठोकण्याअरोदर ललित पाटील २०२० पासून येरवडा कारागृहात अटकेत होता. पण ललित पाटील कारागृहात नावापुरताच असल्याचे समोर आले आहे. कारण ललित पाटीलचे याच काळातील अतिशय धक्कादायक फोटो समोर आले आहे.

ललित पाटीलचे समोर आलेल्या काही फोटोंमध्ये ससूनमधील कैद्यांसाठीच्या १६ नंबर वॉर्डमध्ये बसून चक्क सिगारेट ओढताना दिसत आहे. तर इतर फोटोंमध्ये ललित पाटील हा आपल्या प्रेयसीसोबत पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मौज मजा करताना दिसत आहे. ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर ललित पाटील याच पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्याच सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्याचबरोबर त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे याला देखील पुण्यातील सोमवार पेठेतील एका सोसायटीत भेटल्याचा समोर आले होते.

आता ललित पाटीलचे प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये मौजमजा करतानाचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे येरवडा कारागृहाच प्रशासन आणि ससून रुग्णालयाचे व्यवस्थापन ललित पाटीलने कसे आपल्या मुठीत ठेवले होते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest