Arrested : अल्पवयीन मुलीच्या तोंडावर केली लघूशंका; घृणास्पद कृत्य करणारा आरोपी गजाआड

घराजवळ खेळत असलेल्या सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या तोंडावर लघूशंका करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी १८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. हा तरुण मूळचा नेपाळचा रहिवासी आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 10 Oct 2023
  • 02:42 pm
Arrested : अल्पवयीन मुलीच्या तोंडावर केली लघूशंका; घृणास्पद कृत्य करणारा आरोपी गजाआड

अल्पवयीन मुलीच्या तोंडावर केली लघूशंका; घृणास्पद कृत्य करणारा आरोपी गजाआड

पुणे : घराजवळ खेळत असलेल्या सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या तोंडावर लघूशंका करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी १८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. हा तरुण मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवा भगवती चौधरी (वय १८, रा. अंबारी, नेपाळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३२  वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे  येथील भैरवनाथ मंदिर समोर ही सहा वर्षांची पीडित मुलगी खेळायला गेलेली होती. त्यावेळी फिर्यादी महिला घरामध्ये स्वयंपाक करीत होती. थोड्यावेळाने ही लहान मुलगी धावतच रडत घरी आली. टी खूप घाबरलेली होती. आईने तिला काय झाले असे विचारले असता तिने तिने 'माझ्या तोंडावर मोठ्या दादाने शु केली' असे सांगितले.

फिर्यादी महिलाने मुलीला घेऊन घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी, आरोपी हा तेथील स्वच्छतागृहामधून बाहेर पडताना दिसला. त्याच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest