कोंढव्यातल्या सोसायटीमधील १४० जणांना आक्षेपार्ह मेल
पुण्यात कोंढवा परिसरातील पिसाळी येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आहे. सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेबद्दल “जोशीची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतेय,” अशा आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत एक मेल चक्क सोसायटीच्या १४० सदस्यांना पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
शेखर बाबुलाल धोत्रे याच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या आरोपी शेखर धोत्रे याने ई-मेलवरून ४० वर्षीय महिलेचा आक्षेपार्ह शब्दात उल्लेख केला.
६ ऑगस्ट रोजी आरोपी शेखर धोत्रेने "जोशीची बायको पॉर्नस्टार सारखी दिसतेय, आज चालायला आली नाही का", असा ई-मेल सोसायटीमधील १४० सदस्यांना पाठवून दिला. महिलेला आणि तिच्या पतीला ही बाब समजल्यानंतर त्यांनी शेखरला या संदर्भात जाब विचारला. मात्र, जाब विचारायला गेले असता आरोपीने त्यांना धमकी दिली. जे करायचे ते कर, पोलीस ठाण्यात गेली तर तुला बघुन घेतो, अशा शब्दात धमकावले. तसेच यावेळी धक्काबुक्की देखील केली.
अखेर पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार, पोलीसांनी आरोपी शेखर विरोधात कलम ३५४(अ), ३५२, ५००, ५०६, ३२३ सह आयटी अॅक्ट ६७ नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.