Chakan : उघड्या दरवाजा वाटे एका तासात घरातील दागिने व रोख रक्कम चोरीला

उघड्या दरवाजे वाटे अवघ्या एक तासात सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना शनिवारी (२४ नोव्हेंबर) चाकण येथील राणूबाईमळा परिसरात दुपारी पाच ते सहा या कालावधीत घडली आहे.

Chakan : उघड्या दरवाजा वाटे एका तासात घरातील दागिने व रोख रक्कम चोरीला

संग्रहित छायाचित्र

उघड्या दरवाजे वाटे अवघ्या एक तासात सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना शनिवारी (२४ नोव्हेंबर) चाकण येथील राणूबाईमळा परिसरात दुपारी पाच ते सहा या कालावधीत घडली आहे.

या प्रकरणी महिलेने रविवारी (२५ नोव्हेंबर) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्याकडून घराचा दरवाजा अर्धवट उघडा राहिला होता. यावेळी चोराने दरवाजा वाटे घरात प्रवेश करत घरातील बागे मधून सोन्याचे दागिने व रोख ,रक्कम मोबाईल असा एकूण ६७ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest