पुण्यातून २ कोटींच्या आयफोनची चोरी, चोरट्याला झारखंडमधून अटक

पुण्यातील लोणीकंद येथील वेअर हाऊसचा सिमेंटचा पत्रा तोडून चोरट्यांनी तब्बल २ कोटी रुपये किमतीचे २६६ आयफोन चोरुन नेल्याची घटना १७ जुलै रोजी घडली होती. आता या प्रकरणाची उकल करत एक चोरट्याला झारखंड येथून अटक कऱण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 26 Aug 2023
  • 02:57 pm
iPhone : पुण्यातून २ कोटींच्या आयफोनची चोरी, चोरट्याला झारखंडमधून अटक

पुण्यातून २ कोटींच्या आयफोनची चोरी, चोरट्याला झारखंडमधून अटक

पुण्यातील लोणीकंद येथील वेअर हाऊसचा सिमेंटचा पत्रा तोडून चोरट्यांनी तब्बल २ कोटी रुपये किमतीचे २६६ आयफोन चोरुन नेल्याची घटना १७ जुलै रोजी घडली होती. आता या प्रकरणाची उकल करत एक चोरट्याला झारखंड येथून अटक कऱण्यात आली आहे.

इस्माईल फजल शेख (वय ३५, रा. मध्य पियारपुर, तहसिल उधवा, ठाणा राधानगर, जि. साहेबगंज, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेअर हाऊसचा सिमेंटचा पत्रा तोडून चोरट्यांनी तब्बल २ कोटी रुपये किमतीचे २६६ आयफोन चोरुन नेल्याची घटना १७ जुलै रोजी घडली होती. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्यानुसार, पोलीस चोरट्यांचा शोध घेत असताना चोरटे झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यात सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी झारखंडमध्ये एक पथक पाठवून आरोपी इस्माईल शेखला ताब्यात घेतले. त्याचा ट्राझिस्ट रिमांड घेऊन गुरुवारी लोणीकंद पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने चार साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल टोळीचा म्होरक्याने पश्चिम बंगाल मधील एजंट मार्फत विकल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा लोणीकंद पोलिस अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest