Sassoon drugs case : ससून ड्रग्स प्रकरणासाठी चौकशी समिती, १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची चौकशी समिती नेमली आहे. राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी याबाबतचे आदेश बुधवारी रात्री उशिरा काढले. तसेच येत्या १५ दिवसांत हा अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 12 Oct 2023
  • 12:43 pm
Sassoon drugs case : ससून ड्रग्स प्रकरणासाठी चौकशी समिती,  १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

ससून ड्रग्स प्रकरणासाठी चौकशी समिती, १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

पुणे : पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उघडकीस आलेल्या ड्रग्स  प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. राज्य शासनाने आता या प्रकरणाची संपूर्ण तपासणी करण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची चौकशी समिती नेमली आहे. राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी याबाबतचे आदेश बुधवारी रात्री उशिरा काढले. तसेच येत्या १५ दिवसांत हा अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गेल्या दोन आठवड्यापासून राज्यभर खळबळ माजवणाऱ्या ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण आणि त्यासंबधीत घटनेबाबत सविस्तर चौकशी करणार असून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे.

... अशी असेल समिती

१) अध्यक्ष - डॉ. दिलीप म्हैसेकर, (संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई)

२) सदस्य - डॉ. सुधीर देशमुख, (अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर)

३) सदस्य - डॉ. हेमंत गोडबोले, प्राध्यापक व विभागप्रमुख, न्यायवैद्यक शास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड)

४) सदस्य - डॉ. एकनाथ पवार, प्राध्यापक व विभागप्रमुख, अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग, अँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest