ड्युटीवर जाताना संशय आला, चौकशी केल्यावर निघाले रेकॉर्डवरील गुन्हेगार
ड्युटीवर जात असताना संशय आल्याने पोलीस कर्मचाऱ्याने तिघांकडे चौकशी केली. चौकशीमध्ये तीन जण दुचाकी चोर असून रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचा घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा प्रकार आज (गुरूवारी) सकाळच्या सुमारास पिंपरी चिंचवडमधील हिजवडी येथील ऑडी शोरुमच्या समोर उघडकीस आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पोलीस कर्मचारी अमोल खुडे हे सकाळी देहूरोड येथून हिंजवडी येथे शासकीय कामासाठी (ड्युटी करिता) जात होते. या दरम्यान, हिंजवडी येथील ऑडी शोरूमच्या समोर हायवे लगत तीन संशयित इसम त्यांना दिसून आले. खुडे यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी एक दुचाकी चोरी केलेल्याचे निष्पन्न झाले.
तसेच त्यांच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यांच्याकडे एक गावठी शस्त्र (चऱ्या) असल्याचे निष्पन्न झाले. सदरचे शस्त्र हे त्यांनी त्यांच्या घरी लपवून ठेवल्याचे कबुली दिली आहे. पोलीसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहेत. तीघेही अल्पवयीन असून त्यांच्याकडी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना हिंजवडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.